मुंबई : इमारत मालकाचे बेपर्वा बांधकाम आणि मनमानी कारभारामुळे जीव धोक्यात घालून राहणार्या गिरगाव येथील रहिवाशांची कैफियत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड यांनी मंगळवारी ऐकली. या समस्यांवर रहिवाशांच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन लाड यांनी दिले.
गिरगाव येथील ताराभुवन इमारतीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या इमारतीमधील रहिवाशांना चेंबूर येथील सहकार नगरमध्ये उभारण्यात आलेल्या संक्रमण शिबिरात जागा देण्यात आली आहे. या इमारतीच्या दुरुस्तीचे काम बरेच महिने रखडले आहे. त्यामुळे रहिवाशांना हक्काची जागा असूनही संक्रमण शिबिरात राहावे लागत होते. इमारत मालक जाणीवपूर्वक सबबी पुढे करून रहिवाशांना मूळ जागेत येण्यास विलंब करत असल्याचा आरोप रहिवाशांनी या वेळी लाड यांच्यापुढे केला. चिराबाझार येथील वैरूड इमारतीमधील भाडेकरूंनीही लाड यांच्यापुढे समस्यांचा पाढा वाचाला. या इमारतीच्या मागील भागाची पडझड झाली असून ती केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. इमारत मालकाने पहिल्या मजल्यावर दोन शौचालये बेकायदेशीररीत्या बांधली आहेत. या शौचालयामुळे तळमजल्यावयर राहणार्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मालक इमारतीच्या दुरुस्तीच्या विरोधात असल्याची माहिती भाडेकरूंनी लाड यांना दिली. इमारतीचे भाडेकरू, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment