ऊर्जा खात्याकडून ७३ हजार कोटींची लूट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 November 2013

ऊर्जा खात्याकडून ७३ हजार कोटींची लूट

मुंबई : कोळसा खरेदीतील भ्रष्टाचार, पायाभूत सुविधांवरील खर्चाचा अपव्यय, कृषिपंपांच्या खोट्या बिल आकारणीतून गेल्या १0 वर्षांत ऊर्जा खात्याने राज्यातील जनतेकडून ७३ हजार कोटींची लूट केली असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला. त्यांनी बुधवारी एका आपल्या आरोपाच्या सर्मथनार्थ असलेल्या पुराव्यांची सर्व (२0१४) कागदपत्रे राज्याचे ऊर्जामंत्री अजित पवार यांना सादर केली. आमदार गोपाळ शेट्टी, योगेश सागर, विष्णू सावरा, रामनाथ मोते, चिंतामण वनगा, विजय गिरकर आदी या वेळी उपस्थित होते. 

त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना तावडे म्हणाले की, गेल्या आठ वर्षांत महाजेनकोकडून सुरू केलेल्या औष्णिक प्रकल्पावर तसेच देखभालीवर करण्यात आलेला २0 हजार ९६३ कोटींचा खर्च निष्फळ ठरला. देशी कोळशाला निकृष्ट ठरवून महागडा कोळसा आयात केल्यामुळे महानिर्मितीतील अधिकार्‍यांनी गेल्या सहा वर्षांत चार हजार ८६७ कोटींचा भ्रष्टाचार केला. महानिर्मितीच्या प्रकल्पांतून १७ हजार ९७९ कोटी रुपये किमतीच्या विजेचे कमी उत्पादन झाले. फर्नेस ऑईलचा अतिरिक्त वापर दाखवून गेल्या सहा वर्षांत ऊर्जा खात्याच्या अधिकार्‍यांनी ३ हजार २८६ कोटींची लूट केली, असा आरोपही तावडे यांनी केला. २0१२-२0१३ या काळात झालेली ४ हजार ८00 कोटींची वीजगळती अधिकार्‍यांनी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लपवली, असेही ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS