मुंबई विभागीय केंद्रास दोन सुवर्ण पदके ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 November 2013

मुंबई विभागीय केंद्रास दोन सुवर्ण पदके !

 मुंबई - 28 Nov. 2013 - http://jpnnews.webs.com
मुंबई – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ‘युवक महोत्सवा’त मुंबई विभागीय केंद्राने समूह लोकनृत्य  व लावणी या दोन नृत्य प्रकारात सुवर्ण पदके पटकावली आहेत. विभागीय केंद्र व विद्यापीठीय स्तरावर स्पर्धक विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

मुक्त विद्यापीठाचा युवक महोत्सव नुकताच नाशिक येथे पार पडला. या महोत्सवात राज्यातील विविध विभागीय केंद्रांचे स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले होते. समूह नृत्य स्पर्धेत मुंबई विभागीय केंद्राच्या रचना आरडे, तेजश्री तळाशीलकर, रेणुका कामेरकर, आकाश खांबे, किशोर लेपकर, चेतन तळाशीलकर या विद्यार्थ्यांची कोळी नृत्यावर सादरीकरण केले. तर, तेजश्री तळाशीलकर हिने लावणी या लोकनृत्यावर सादरीकरण केले. मुंबई विभागीय केंद्राचे विभागीय संचालक डॉ.प्रकाश देशमुख तसेच अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. विजेते विद्यार्थी डिसेंबर महिन्यात लोणेर येथे होणा-या आंतरविद्यापीठीय ‘युवक महोत्सवात’ सहभागी होणार आहेत.   

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS