मुंबई : बेस्टच्या बसगाड्यांमधून विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांमध्ये अशा फुकट्या प्रवाशांविरुद्ध केलेल्या कारवाईत २५ हजार ५७ फुकटे प्रवासी आढळून आले असून त्यांच्याकडून १७ लाख ७१ हजार ५६५ एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.बेस्टच्या बसने प्रवास करीत असताना विनातिक ीट प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध तसेच खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणार्या प्रवाशांविरुद्ध बेस्ट प्रशासनातर्फे विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली होती. विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांनी प्रवास भाडे अधिक देय असलेल्या प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट रक्कम भरण्याचे नाकारल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियम १८८८च्या कलम ४६0 (ह) अन्वये एक महिना पोलीस कोठडी किंवा २00 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. बसमधून प्रवास करताना योग्य तिकीट खरेदी करणे हे प्रत्येकाला बंधनकारक असून विनातिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हा आहे. सर्व प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान आणि मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट खरेदी करावे, तसेच तिकिटावर प्रमाणित केलेल्या अंतराएवढाच प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.
Post Top Ad
20 November 2013
Home
Unlabelled
बेस्टमध्ये फुकटे प्रवासी वाढले
बेस्टमध्ये फुकटे प्रवासी वाढले
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment