मॅक्डोनल्डच सांगते फास्टफूड खाऊ नका! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 December 2013

मॅक्डोनल्डच सांगते फास्टफूड खाऊ नका!

26/12/2013 http://jpnnews.webs.com

वॉशिंग्टन - बर्गर, फ्रेंच फ्राइज, पिझा यांसारखे फास्ट फूड म्हणून ओळखले जाणारे पदार्थ आरोग्याला हानिकारक असतात आणि हे पदार्थ टाळण्याचा सल्ला अनेक डॉक्टरांकडून आणि आहारतज्ज्ञांकडून दिला जात असतो. पण हे पदार्थ जी कंपनी बनवते त्या कंपनीकडूनच असा सल्ला दिला गेल्यामुळे खळबळ उडाली आहे.

अनेक देशांमध्ये पोहोचलेल्या आणि गेल्या काही वर्षात भारतातही लोकप्रियता मिळवलेल्या मॅक्डोनल्ड या कंपनीने स्वत:च फास्ट फूड खाऊ नका, असा सल्ला दिला आहे. अर्थात, हा सल्ला त्यांच्या ग्राहकांसाठी नसून तो त्यांच्या कर्मचा-यांसाठी आहे.
जे खाद्यपदार्थ मॅक्डोनल्डचे कर्मचारी इतरांना खाऊ घालतात, ते पदार्थ त्यांनी खाऊ नयेत, असे कंपनीला वाटते. त्यासाठीच त्यांनी स्वत:च्या वेबसाइटवर जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कर्मचा-यांसाठी आरोग्यविषयक सूचना केल्या आहेत.
कर्मचा-यांनी बर्गर आणि फ्राइज खाण्यापेक्षा सॅलड्स आणि सँडविच यांसारखे पदार्थ खावेत असा सल्ला मॅक्डोनल्डने दिला आहे. त्यासाठी त्यांनी ग्राफिक्सचाही वापर केला आहे. या ग्राफिक्समध्ये त्यांनी स्वत: तयार करत असलेले खाद्यपदार्थ एका तक्त्यात दाखवले आहेत.
तर दुस-या तक्त्यात त्यांनी आरोग्यासाठी चांगले असलेले पदार्थ दाखवले आहेत. आपल्या कर्मचा-यांना आहारविषयक सल्ला देताना, कर्मचा-यांनी अतिरिक्त चीज, मेयॉनीज टाळावे असेही सांगण्यात आले आहे. त्याच प्रकारे इतरही सल्ले त्यांच्या ‘केवळ कर्मचा-यांसाठी’ असलेल्या वेबसाइटवर दिले आहेत.
कर्मचा-यांना सल्ला
ब-याचदा तुम्ही जेव्हा फास्ट-फूड रेस्टॉरंटमध्ये खाता तेव्हा तुम्हाला सकस आहार मिळणे तसे अवघडच असते. या रेस्टॉरंटमधील अन्नामध्ये खूप जास्त प्रमाणात फॅट्स असतात. जरी ते धोकादायक असे ‘ट्रान्स फॅट’ नसले तरी अनेक फास्ट-फूड रेस्टॉरंट्समध्ये कमी फॅट असलेले पदार्थ मिळत नाहीत. ज्या ठिकाणी सॅलड्स, सूप आणि भाज्या अशी विविधता असलेले अन्न मिळते, त्याच ठिकाणी खात जा, असा सल्ला कर्मचा-यांना देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS