मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील छोट्या स्थानकांवरील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात दिव्य करावे लागते. लांब पल्ल्याच्या मार्गावरील छोट्या स्टेशनवरील प्रवाशांना पटकन तिकीट काढता यावे, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एक नामी योजना आखली आहे. या योजनेनुसार मध्य रेल्वे मार्गावरील छोट्या ११ स्थानकांवर तिकीट विक्रीसाठी कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. त्यामुळे छोट्या स्थानकांवरील प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट मिळण्यास मदत होणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या लांब पल्ल्याच्या मार्गावरील छोट्या स्थानकांवर तिकीट देण्यासाठी कर्मचारी नेमण्याचे ठरविले आहे. हा कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने छोट्या स्थानकांवर प्रवाशांसाठी स्टेशन तिकीट बुकिंग सिस्टीम ही नवी पद्धत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे मार्गावरील खंडाळा, कामण रोड, खारबाव, आपटा, जिते, सोमाटणे, पेण, नागोठणे, निळजे, तळोजा या छोट्या स्थानकांवर हा कर्मचारी नेमण्यात येणार आहे. त्यासाठी जाहिरात देऊन या क र्मचार्यांची नेमणूक क रण्यात येणार आहे. या योजनेनुसार प्रत्येक स्थानकावर एक कर्मचारी नेमण्यात येणार आहे. या कर्मचार्याला तिकीट विक्रीवरील कमिशन मानधन म्हणून दिले जाणार आहे. त्यानुसार १५ हजारांच्या तिकीट विक्रीसाठी १५ टक्के, १५ ते ५0 हजारांच्या तिकीट विक्रीपर्यंत १२ टक्के आणि ५0 हजार ते १ लाख रुपयांपर्यंतच्या तिकीट विक्र ीसाठी ४ टक्के या पद्धतीने कमिशन देण्यात येणार आहे.


No comments:
Post a Comment