बेस्ट वीज देयकाचे सर्व्हर तात्पुरते बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2013

बेस्ट वीज देयकाचे सर्व्हर तात्पुरते बंद

 24/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : बेस्ट उपक्रमाचे वीज देयके (बिल) देणार्‍या कंपनीचा सर्व्हर तांत्रिक कारणामुळे गेल्या १0 दिवसांपासून बंद पडला आहे. त्यामुळे मुंबई शहरातील रहिवाशांना विलंबाने देयके पाठवण्यात आली आहेत. परिणामस्वरूप ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे. संबंधित कंपनीचे सर्व्हर बंद पडण्याच्या घटनेचे बेस्ट समितीच्या बैठकीत सोमवारी तीव्र पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेवकांना संबंधित कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची मागणी केली. या वेळी बेस्टचे अध्यक्ष संजय (नाना) आंबोले यांनी संताप व्यक्त करत वीज देयकाच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश दिले.

बेस्ट उपक्रमाने शहरातील वीज ग्राहकांना देयके पाठवण्याचे कंत्राट केजीएलजी या कंपनीला दिले होते. मात्र या कंपनीच्या कामाची पद्धत समाधानकारक नसल्यामुळे देयकांचे कंत्राट टी.व्ही. स्टार या कंपनीकडे सोपविण्यात आले होते. मात्र या कंपनीचे सर्व्हर दुसर्‍यांदा बंद पडल्याची घटना घडली आहे. देयके विलंबाने मिळत असल्यामुळे ग्राहकांकडून व्याज दर आकारण्याची शक्यता आहे. मनसेचे बेस्ट समितीमधील सदस्य केदार हुबांळकर यांनी या प्रकरणाला वाचा फोडली.
माजी आयुक्तांना सदोष बिल
पालिकेचे माजी आयुक्त डॉ. जयराज फाटक यांना बेस्टतर्फे दरमहा १४ युनिट वीज बिल आकारले जाते. आता बेस्टतर्फे त्यांना तब्बल १४ हजार ७00 युनिटचे लाखो रुपयांचे देयक आकारले आहे. सनदी अधिकार्‍यास सदोष बिल पाठवण्यात आल्यामुळे सामान्यांचे काय होणार, अशी कुजबुज सदस्यांमध्ये ऐकावयास मिळाली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS