31/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : केंद्र पुरस्कृत आश्रमशाळेच्या मान्यता प्रकरणी झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी घेऊन आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एका संस्थाचालकाने मंत्रालयाच्या कोणत्याही मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा इशारा सोमवारी दिला. सोलापूर येथील आश्रमशाळा संस्थापक मधुकर वंजाळे यांनी या प्रकरणी माहितीच्या अधिकाराखाली घेतलेल्या माहितीवरून त्यांनी आझाद मैदानात ६६४ दिवसापासून आंदोलन सुरूठेवले आहे. सोमवारी त्यांच्या आंदोलनाला ६६५ दिवस झाले. ज्या आश्रमशाळा फक्त कागदावरच आहेत अशा आश्रमशाळांनाही मान्यता दिली गेली आहे, असा आरोप करत वंजाळे यांनी जिल्हाधिकारी पटपडताळणी अहवालाच्या कागदपत्रांची यादी सरकारकडे दिली आहे. सरकारने या प्रकरणी चौकशी समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. राज्यातील २८८ आश्रमशाळांची मान्यता, झालेल्या भ्रष्टाचारात गुंतलेले मंत्री, संस्थाचालक, दलाल आदी संबंधितांची सर्व माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला दिली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना याबाबत सर्व पुरावे दिले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी झाली नाही तर १५ जानेवारीनंतर कुठल्याही दिवशी मंत्रालयाच्या कोणत्याही मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा इशारा मधुकर वंजाळे यांनी दिला आहे.

No comments:
Post a Comment