खड्डे बुजवण्याच्या कामात भ्रष्टाचार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 December 2013

खड्डे बुजवण्याच्या कामात भ्रष्टाचार

मुंबई 12/12/2013- http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) :
मुंबई : पालिका अधिकारी व कंत्राटदार यांनी संगनमताने मुंबईतील खड्डय़ांच्या मोजमापात फेरफार करून वाढीव बिले तयार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून प्रशासनाने जनतेचीच नाही तर उच्च न्यायालयाची फसवणूक केल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्डे पडतात. त्याचे फोटो नागरिकांकडून पालिकेच्या वेबसाईटवर टाकण्यात येतात. त्यानंतर पालिकेचे अभियंते त्या खड्डय़ांच्या लांबी-रुंदी तसेच खोलीचे मोजमाप करून त्यांच्या दुरुस्तीचे काम कंत्राटदारांमार्फत करून घेतात. मात्र, पालिकेचे संबंधित अधिकारी कंत्राटदारांशी संगनमत करून मोजमापात फेरफार करत वाढीव बिले तयार करून पालिके ची लूट करत असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईतील २८0५ खड्डे अशा प्रकारे भरल्याचे निदर्शनास आले आहे. दरम्यान, जुलै महिन्यात मुंबईतील रस्त्यांच्या दुर्दशेमुळे न्यायालयाने स्वत:हून याचिका दाखल करून घेतली होती. त्या वेळी पालिका प्रशासनातर्फे उच्च न्यायालयात मुंबईतील खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजनांची माहिती दिली होती. मात्र, आपल्याकडे आलेल्या पुराव्यानुसार अनेक ठिकाणी खड्डे न बुजवता फक्त त्यांची बिले तयार करण्यात आली आहेत. बर्‍याच ठिकाणी खड्डय़ांच्या मोजमापात फेरफार करून वाढीव बिले तयार करण्यात आली आहेत. ही माहिती आपण पालिकेच्या वेबसाईटवरून काढली असून त्याबाबतचा पुरावा सीडीच्या स्वरूपात उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीशांकडे पाठवून त्याची दखल घेण्याची मागणी आपण केल्याचे देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS