थर्टीफस्र्टसाठी मरेच्या ६ विशेष लोकल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2013

थर्टीफस्र्टसाठी मरेच्या ६ विशेष लोकल



31/12/2013  http://jpnnews.webs.com
मुंबई : थर्टीफस्र्टची मजा लुटणार्‍यांसाठी मध्य रेल्वेतर्फे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेतर्फे ६ विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. मेन लाइन, हार्बर लाइनवर या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. 

नववर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री उशिरा घराबाहेर राहणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनातर्फे ६ विशेष लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. सीएसटी ते कल्याण, सीएसटी ते ठाणे आणि सीएसटी ते पनवेल या स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर प्रत्येकी २-२ लोकल गाड्या चालविण्यात येणार आहेत. या विशेष लोकल गाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS