| 24/12/2013 http://jpnnews.webs.com मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या खालून जाणार्या उपयोगिता सेवांकरिता संबंधित बाह्य उपयोगिता संस्थाकडून रस्त्याच्या वापराकरिता उपागमन आकारणी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या विचारधीन आहे. गा प्रस्ताव मंजूर झाला तर महापालिकेला अंदाजे २00 कोटी रुपये वार्षिक उत्पन्न मिळू शकेल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी दिली आहे. यासंदर्भात माहिती देताना शेवाळे यांनी सांगितले की, महापालिकेच्या रस्त्यांवर आतापर्यंत सुमारे २८ उपयोगिता संस्थांकडून उपयोगिता सेवा (वीज तार, वायुनलिका इत्यादी) टाकण्याचे काम करण्यात येते. उपयोगिता सेवा रस्त्यांखाली टाकण्याची परवानगी देताना या उपयोगिता संस्थांकडून आजपर्यंत फक्त रस्त्यांच्या पुनर्पृष्टीकरणाची आकारणी करण्यात येत होती. तथापि रस्त्याखालून जाणार्या या उपयोगिता सेवांच्या, बृहन्मुंबई महापालिकेच्या रस्त्यांच्या सतत होणार्या वापराबाबत कोणत्याही प्रकारची आकारणी करण्यात येत नव्हती, ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या रस्त्यांच्या सततच्या वापरासाठी या विविध बाह्य उपयोगिता संस्थांकडून उपागमन आकारणी म्हणून रुपये १00/- प्रति मीटर दरवर्षी या दराने आकारणी करण्याचे महापालिकेने प्रस्तावित केले आहे. सन २0१३-१४ च्या अर्थसंकल्पात तसे नमूद केले आहे. या माध्यमातून महापालिकेला या आर्थिक वर्षात सुमारे २00 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळू शकेल. वीज तार, ऑप्टीकल फायबर तार, वायुनलिका अशा उपयोगितांसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. प्रत्येक बाह्य उपयोगिता संस्थेला त्यांच्या उपयोगितांवर लागू होणार्या सदर उपागमन आकारणी वसुलीकरिता मागणीपत्र पाठविण्यात येईल. उपयेगिता संस्थांकडून त्यांच्या सध्याच्या अस्तित्वात असलेल्या उपयोगिता जाळय़ांची माहिती जीआयएस स्वरूपात मोटे/ छोटे रस्तेनिहाय लांबीच्या तपशिलासकट घेण्यात येईल. उपागमन आकारणीची वसुली रस्ते विभागाच्या माध्यमातून करण्याची तजवीज करण्यात येईल. तसेच सदर आकारणी स्वतंत्र अर्थशीर्षाखाली जमा करण्यात येईल. बृहन्मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभेमध्ये सदर प्रस्ताव विचाराधीन असून स्थायी समितीत होणार्या चर्चेअंती याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी नमूद केले आहे. |
Post Top Ad
24 December 2013
Home
Unlabelled
उपयोगिता सेवांसाठी बाह्य संस्थांकडून आकारणी विचाराधीन - राहुल शेवाळे
उपयोगिता सेवांसाठी बाह्य संस्थांकडून आकारणी विचाराधीन - राहुल शेवाळे
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment