| 3/12/2013 http://jpnnews.webs.com मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने ९ सप्टेंबर २0१३ रोजी ऐतिहासिक आदेश दिला असला तरी फेरीवाल्यांच्या संदर्भातील राष्ट्रीय धोरणाच्या आधारे नियोजित कायद्याला राज्यसभेची विनाविलंब मंजुरी द्यावी, या मागणीसाठी १३ डिसेंबरला दिवशी दिल्ली येथे संसदेसमोर फेरीवाल्यांचे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती नॅशनल हॉकर्स फेडरेशनचे नेते शरद राव यांनी दिली. नॅशनल हॉकर्स फेडरेशनच्या बॅनरखाली देशातील फेरीवाला संघटनेच्या नेत्याची रविवारी मुंबईत सभा झाली. त्या वेळी या सभेत देशभरातील फेरीवाला संघटनांमधून अध्यक्षपदी शरद राव यांची निवड झाली. या सभेत संपूर्ण देशातील फेरीवाला संघटना त्यांच्या संघटना संलग्न नॅशनल हॉकर्स फेडरेशनशी संलग्न कराव्यात, असे आवाहन करण्यात आल्याचे शरद राव यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. केंद्राच्या स्टँडिंग कमिटी व अधिवेशनात लोकसभेची मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे १३ डिसेंबरला संसदेवर धडक देऊन धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी हजारो फेरीवाले या आंदोलनात सहभागी होतील, असेही राव यांनी स्पष्ट केले. |
Post Top Ad
03 December 2013
Home
Unlabelled
फेरीवाल्यांचे १३ डिसेंबरला संसदेसमोर धरणे आंदोलन
फेरीवाल्यांचे १३ डिसेंबरला संसदेसमोर धरणे आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment