पालिका शाळांतील शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करा - मुख्यमंत्री - JPN NEWS 2.

Post Top Ad

JPN NEWS

पालिका शाळांतील शिक्षकांना सहावा वेतन आयोग लागू करा - मुख्यमंत्री

Share This
मुंबई / 11/12/2013-  http://jpnnews.webs.com ( JPN NEWS website ) :
मुंबई : नगरपालिका व महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याबाबतचा शासनादेश शालेय शिक्षण विभागाने काढावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिल्याने अधिवेशन संपण्यापूर्वी आदेश निर्गमित करावा, अशा सूचनाही शालेय शिक्षण विभागाच्या मंत्रालयीन अधिकार्‍यांना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सहावा वेतन देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. यासंदर्भात वारंवार लक्षवेधी, चर्चा, निवेदने, आवेदने देण्यात आली होती. राज्यातील खाजगी अनुदानित, जिल्हा परिषदा यांमध्ये काम करणार्‍या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे सहावा वेतन आयोग लागू करण्यात आला. मग नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचर्‍यांना सहावा वेतन आयोग का लागू केला जात नाही? असा सवाल वारंवार केला जात होता. या प्रकरणी नगरपालिका तसेच महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील शिक्षकांनी अनेक वेळा आंदोलने केली. हा प्रश्न घेऊन आझाद मैदानातही धरणे आंदोलने केली, मात्र या मुद्दय़ावर निर्णय घेतला जात नव्हता. आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीच आदेश दिल्यामुळे हा प्रश्न निकाली निघाला आहे. यासंदर्भात आमदार रामनाथ मेते यांनी वारंवार लक्षवेधी सूचनेद्वारे शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे संघटनमंत्री अनिल बोरनारे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages