3/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : महापालिका सेवा अधिनियम ३२ नुसार महापालिकेतील शिक्षक प्रवर्ग सोडून इतर सर्व कर्मचार्यांना पदोन्नतीच्या वेळी एक वेतनवाढ देऊन त्यानंतर त्या कर्मचार्याला स्टेप-अप करण्यात आले. मात्र, श्क्षिकांना कालबद्ध वेतनश्रेणी देताना ३२ नियमातून वगळल्याने शिक्षकांचे फार मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे एकाच महापालिकेतील कर्मचार्यांमध्ये भेदभाव करत आर्थिक नुकसान करणारे परिपत्रक त्वरित रद्द करून पालिका शिक्षकांनाही सेवा अधिनियम ३२ लागू करण्याची आग्रही मागणी शिक्षक सभेत एका लेखी निवेदनाद्वारे पालिका प्रशासनाकडे केली आहे.
प्राथमिक शिक्षक प्रवर्गाला कालबाह्य पदोन्नती व त्रिस्तरीय वेतनश्रेणी अशा दोन्ही योजनांचा फायदा सहाव्या वेतन आयोगाने दिलेला आहे; परंतु महापालिकेच्या आस्थापना प्रशासनाने कालबाह्य पदोन्नती व त्रिस्तरीय वेतनश्रेणी या संकल्पनांचीच गल्लत केल्यामुळे शिक्षकाला त्रिस्तरीय वेतनश्रेणीप्रमाणे शैक्षणिक अर्हतेनुसार वेतनश्रेणी मिळालेली नाही आणि २00८ मध्ये आलेल्या हकीम अहवालाला पूर्वलक्षी प्रभावाने अमलात आणल्यामुळे कालबाह्य पदोन्नतीचा हा लाभ पालिका शिक्षकांना देण्यात आलेला नसल्याची बाब रमेश जोशी यांनी सामान्य प्रशासन उपायुक्त किरण आचरेकर यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केली आहे.


No comments:
Post a Comment