मुंबई - 10/12/2013 - http://jpnnews.webs.com
नवी दिल्ली : भारतातील निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच वापरण्यात आलेले उमेदवार नापसंतीचे बटण म्हणजेच 'नोटा'चा वापर चार राज्यांमधील एकूण १५ लाख मतदारांनी केला आहे. सुशिक्षित दिल्लीपेक्षा अशिक्षित व मागास समजल्या जाणार्या छत्तीसगडमधील जनता 'नोटा'च्या वापरात आघाडीवर राहिली, हे विशेष. दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड विधानसभा निवडणुकांदरम्यान पहिल्यांदाच वापरण्यात आलेल्या 'नोटा' बटणाचा वापर किती मतदार करतात व त्याचा निवडणूक निकालांवर कसा परिणाम होतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. याविषयी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार चारही राज्यांमधील एकूण ११.५३ कोटी मतदारांपैकी १५ लाख मतदारांनी 'नोटा'चा पर्याय स्वीकारल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक ५.९ लाख मतदार हे मध्य प्रदेशमधील, ५.६७ लाख मतदार राजस्थानमधील, ३.५६ लाख मतदार हे छत्तीसगडमधील तर दिल्लीतील सर्वात कमी म्हणजेच ४९,७३0 मतदारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शिक्षित मतदार असल्याने दिल्लीतील मतदारच 'नोटा'चा सर्वाधिक वापर करतील, असा अंदाज निवडणुकीपूर्वी वर्तवण्यात आला होता.


No comments:
Post a Comment