'आदर्श' अहवाल फेटाळणारे सरकार बरखास्त करा - आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 December 2013

'आदर्श' अहवाल फेटाळणारे सरकार बरखास्त करा - आठवले

मुंबई : घोटाळेबाजांना पाठीशी घालण्यासाठी 'आदर्श'चा अहवाल फेटाळणारे महाराष्ट्र सरकार बरखास्त करा, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी राज्यपालांकडे केली आहे. तसेच 'आदर्श' अहवालावर पुनर्विचार करावा व या अहवालावर सखोल चर्चा घडविण्यासाठी विधानसभेचे तीन दिवसीय स्वतंत्र अधिवेशन घ्यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. 'आदर्श' अहवालाने ठपका ठेवलेल्या दोषींवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अन्यथा रिपब्लिकन पक्ष आंदोलन छेडेल, असा इशारा आठवले यांनी दिला आहे. 'आदर्श' अहवाल फेटाळून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोषींना पाठीशी घालीत आहेत. त्यांची ही भूमिका त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर कलंक लावणारी आहे. 'आदर्श'सारखे नवीन घोटाळे करण्याची संधी मिळू नये यासाठी भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणारे सरकार त्वरित बरखास्त करावे आणि लोकसभेबरोबरच विधानसभेच्याही निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS