22 December 2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबई महापालिकेच्या मुलुंड (प.) येथे बांधून तयार असलेल्या संत जलाराम बाप्पा मंडईच्या लोकार्पणास अखेर पालिकेला मुहूर्त सापडला आहे. या मंडईचा लोकार्पण सोहळा शुक्रवार, २७ डिसेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमाचे उद््घाटन मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष खा. संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे.
संत जलाराम बाप्पा मंडईची बरीच दुरवस्था झाली होती. त्यामुळे पालिकेने खाजगी विकासकाकडून या मंडईचा पुनर्विकास केला. या मंडईत १४९ गाळेधारक असून त्यात भाजी, कटलरी, कपडे विक्रेत्यांचा समावेश आहे. तळ अधिक तीन मजले अशी ही इमारत तयार करण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून तयार असलेली ही इमारत लोकार्पणाच्या प्रतीक्षेत होती. शिवाय येथील गाळे वितरित व्हायचे बाकी होते. त्यामुळे येथील व्यापार्यांमध्ये कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत होता. या गाळेधारकांची समस्या भाजपाचे मनोज कोटक यांनी मध्यंतरी चव्हाट्यावर आणली होती. आता २७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता या मंडईचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगरसेविका भावना जोबनपुत्रा असणार आहेत. या प्रसंगी सभागृह नेते यशोधर फणसे, आयुक्त सीताराम कुंटे, स्थायी समिती सभापती राहुल शेवाळे, भाजपाचे नगरसेवक मनोज कोटक, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते धनंजय पिसाळ, भाजपाचे गटनेते दिलीप पटेल, सपाचे गटनेते रईस शेख, मनसेचे गटनेते संदीप देशपांडे, अपक्ष गटनेते मनोज संसारे, उपायुक्त विशेष आनंद वागराळकर, सहाय्यक आयुक्त (बाजार) राजेश काटकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

No comments:
Post a Comment