| 19/12/2013- http://jpnnews.webs.com मुंबई : एका हॉटेल मालकाकडून १ लाख ७५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुंबई महानगरपालिकेच्या दोन अभियंत्यांसह मुकादम व आणखी एक अशा चौघांना बुधवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 'ए' वॉर्ड पालिका कार्यालयातील दुय्यम अभियंता प्रवीण धवले, कनिष्ठ अभियंता सचिन सोनावणे, मुकादम कृष्णा पवार आणि सतीश पाटील अशा चौघांचा समावेश आहे. पालिकेच्या 'ए' वॉर्ड हद्दीत फोर्ट विभागात एका हॉटेलच्या नूतनीकरणाचे काम ऑक्टोबर २0१३ पासून करण्यात येत आहे. हे काम सुरू असताना २३ नोव्हेंबर रोजी या हॉटेलात दुय्यम अभियंता प्रवीण धवले यांचे नाव सांगत ३ लोक आले व त्यांनी हे काम बंद करायला सांगितले. त्यानंतर ६ डिसेंबर रोजी मुकादम कृष्णा पवार याने हॉटेलमध्ये पालिकेची नोटीस लावली. त्यानंतर हॉटेलमालकाला बाहेर नेऊन तेथे त्यांच्याकडे ४ लाखांची मागणी केली. तडजोडीने ही देवाणघेवाण १ लाख ७५ हजारांवर नक्की झाली. त्यावर हॉटेल मालकाने याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. ठरल्याप्रमाणे १ लाख ७५ हजारांची रक्कम पालिका कर्मचारी स्वीकारणार असल्याने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने तेथे सापळा रचला व लाचेची रक्कम स्वीकारताना मुकादम पवार व सतीश पाटील यांना रंगेहाथ अटक केली. या दोघांची कसून चौकशी केली असता 'ए' वॉर्डचे पालिकेचे दुय्यम अभियंता प्रवीण धवले व कनिष्ठ अभियंता सचिन सोनावणे या दोघांना ताब्यात घेतले. |
Post Top Ad
19 December 2013
Home
Unlabelled
पालिकेच्या दोन लाचखोर अभियंत्यांसह चौघांना अटक
पालिकेच्या दोन लाचखोर अभियंत्यांसह चौघांना अटक
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment