4/12/2013 http://jpnnews.webs.com
मुंबई : मुंबईमध्ये राहणार्या सफाई कर्मचार्यांना गावकुसाबाहेर चेंबूर येथे पाठवण्याच्या व कर्मचार्यांसाठी बांधण्यात आलेल्या या निवासी वसाहतीच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा पालिका प्रशासनाचा डाव आहे, असा आरोप म्युनिसिपल मजदूर युनियनचे कार्याध्यक्ष अँड़ नवनाथ महारनवर यांनी केला. सफाई कर्मचार्यांचे पुनर्वसन ते राहात असलेल्या विभागात करावे, त्यांना मालली हक्काने घरे द्यावीत आदी युनियनच्या मागण्या असून, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच याबाबत न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुढे ते म्हणाले की, मुंबई मनपाच्या सफाई खात्यात ९0 टक्के कामगार दलीत समाजातील आहेत. सकाळी कामावर वेळेत पोहचता यावे, यासाठी प्रत्येक प्रशासकीय विबागात मनपाने सफाई कामगारांसाठी वसाहती बांधल्या, मात्र डॉकयार्ड दुर्घटनेनंतर जाग आलेल्या प्रशासनाने सर्व वसाहती धोकादायक असल्याचा साक्षात्कार होऊन या इमारतीतील कामगारांना माहुल, चेंबूर येथे स्थलांतरित करण्याचा आदेश प्रशासनाने काढला. जे स्थलांतर करणार नाहीत त्यांना निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या. पालिका प्रशासनाची ही कृती चुकीची तसेच बिल्डरधजिर्नी असल्याचा आरोपही त्यांनी केला.


No comments:
Post a Comment