13/1/2014
मुंबई : अलीकडच्या काळात प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया पद्धतीतील घटनांचे कव्हरेज वादाच्या भोवर्यात सापडले असतानाच मुंबईत येत्या १४ आणि १५ फेब्रुवारी रोजी जबाबदार संवादावर लक्ष केंद्रित करणारी जागतिक परिषद आयोजित केली जाणार आहे. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडिया (पीआरसीआय)ने या परिषदेचे आयोजन केले असून त्यात देशभरातील पब्लिक रिलेशन्स, जाहिरात, एचआर, प्रसारमाध्यमे आणि अभ्यासक सहभागी होणार आहेत. या परिषदेचे आयोजन प्रेस क्लब, मुंबईच्या सहयोगाने करण्यात येणार आहे. या वेळी कदाचित आतापर्यंत प्रथमच नवीन पिढीलाही एक जागतिक व्यासपीठावर स्वत:ला व्यक्त करण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेचे आयोजक म्हणून पीआरसीआयकडून याच विषयावर आधारित मास कम्युनिकेशनच्या आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मास कम्युनिकेशनच्या प्रत्येक महाविद्यालयाला तीन विद्यार्थ्यांपर्यंत सहभाग असलेल्या संघाला पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील पाच सवरेत्तम विजेत्या संघांना या परिषदेतील सत्रांमध्ये चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.

No comments:
Post a Comment