मरिन ड्राईव्हचा मेकओव्हर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 January 2014

मरिन ड्राईव्हचा मेकओव्हर



16/1/2014
मुंबई : मरिन ड्राईव्ह येथील नेताजी सुभाषचंद्र बोस या साडेचार किलोमीटर मार्गाचे मुंबई महापालिकेतर्फे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. हा रस्ता मास्टिक अस्फॉल्ट या नव्या तंत्रज्ञानाने बनवण्यात येणार आहे. नेहमीच वर्दळ असणार्‍या या मार्गावरील वाहतुकीला कुठल्याही प्रकारे अडथळा न येता काम करण्यात येणार आहे. उर्वरित आठशे मीटरच्या रस्त्याचे सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे.

रस्ते सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पार पडले. त्या वेळी महापौर सुनील प्रभू सभागृह नेते यशोधर फणसे, स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रस्त्याच्या दुभाजकाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. याशिवाय जास्त काळ टवटवीत राहणार्‍या फुलांचे रोपण करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS