मुंबई : पालिकेच्या शाळांचा दर्जा वाढावा, तेथील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी, विद्यार्थ्यांचा परीक्षेचा निकाल १00 टक्के लागावा, यासाठी व्हच्यरुअल क्लास रूम, प-पाण्याचा या पुस्तकातून विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्व पटवणे, यासारखे प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न पालिकेकडून केला जात आहे. शैक्षणिक विकासाबरोबर विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास करण्याबाबत मात्र प्रशासन उदासीन असल्याचा आरोप करतानाच शारीरिक शिक्षण विभागासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी भाजपाचे नगरसेवक विनोद शेलार यांनी केली.
शारीरिक शिक्षण विभागाला स्पर्धा व विविध उपक्रम राबवण्यासाठी २0१३-१४ साठी १,५८,४७000 रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र या विभागाला चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या पदांवर वरिष्ठ पर्यवेक्षक, प्राचार्य, लिपिक आदी पदे ५ वर्षांपासून रिक्त आहेत. मुंबई मनपाच्या १४५ शाळांमध्ये शारीरिक शिक्षणासाठी फक्त ३४ शारीरिक शिक्षक कार्यरत आहेत. शारीरिक शिक्षण विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक, क्षेत्र संघटक, स्काऊट गाईड ट्रेनर, प्राचार्य, शारीरिक शिक्षक या पदांवरील कर्मचार्यांची वेतन श्रेणी अद्यापि निश्चित न झाल्याने ते वेतन थकबाकीपासून वंचित आहेत. आरएसपी, स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांना मनपा २00७-0८ नंतर वर्षाला एक गणवेशही पुरवू शकली नाही. शारीरिक शिक्षण विभागातील शिक्षक कर्मचार्यांना पालिकेने आवश्यक त्या सुविधा व साहित्य पुरवले पाहिजे, या विभागातील प्रश्नांची त्वरित तड लावावी, यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:
Post a Comment