दहा दिवसांत मुंबईत मोनो रेल धावणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2014

दहा दिवसांत मुंबईत मोनो रेल धावणार

मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकर प्रतीक्षा करीत असलेल्या देशातील पहिल्या "मोनो रेल'साठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) रेल्वे सुरक्षा प्राधिकरणाकडून आज रेल्वे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता येत्या दहा दिवसांतच चेंबूर ते वडाळादरम्यानची ही पहिली मोनो रेल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. 

"मोनोसाठी रेल्वेचे निवृत्त मुख्य सुरक्षा आयुक्त जी. पी. गर्ग यांच्याकडून आम्हाला आजच सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे मोनो रेल सुरू करण्यासाठी आता पूर्णपणे सज्ज झाली आहे. आता आम्ही राज्य सरकारकडे यासंदर्भातील अहवाल पाठवत आहोत. त्यानंतर राज्य सरकार मोनो सुरू करण्याबाबची अधिसूचना प्रसिद्ध करेल आणि मग लगेचच मोनोच्या उद्घाटनाचा कार्यक्रम करता येईल', असे एमएमआरडीएचे आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS