3 /1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : पालिकेच्या नायर रुग्णालयामधील दिवस-रात्र रुग्णांच्या सेवेत असलेल्या अवघ्या २५वर्षीय निवासी डॉक्टरचे डेंग्यूने निधन झाले. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच निवासी डॉक्टरांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. सुमेध पझारे या निवासी डॉक्टरला मागील सात दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र तपासणीअभावी त्याच्या आजाराचे निदान होत नव्हते. अखेर त्याला नायर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
अशाप्रकारे अनेक निवासी डॉक्टर रोज रुग्णांवर उपचार करता करता स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याबाबतही वैद्यकीय विभाग तितकासा पुढाकार घेत नसल्यामुळे या डॉक्टरांना अचानक उद्भवलेल्या आजाराबाबत कळत नाही. परिणामी, सुमेध पझारे सारखी एखादी घटना समोर येते. सुमेधला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले, मात्र तेथे डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आले. सुमेधच्या निधनाबद्दल कळल्यानंतर डॉक्टर तसेच प्राध्यापकांनी नायर रुग्णालयाकडे धाव घेतली. निवासी डॉक्टरांना आजार किंवा संसर्गजन्य आजार झाल्याच्या बाबी अनेकदा पुढे आल्या आहेत; परंतु तरीही याबाबत कुठलाही निर्णय घेतला जात नव्हता. मात्र अखेर वैद्यकीय शिक्षण विभागाने मुंबईतील निवासी डॉक्टरांच्या आरोग्याच्या तपासणीचा निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी योग्यप्रकारे होते की नाही किंवा किती प्रमाणात होते, हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राज्यातील पालिकेच्या तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये राज्यभरातून जवळपास ३ हजार ५00 डॉक्टर कार्यरत आहेत. या डॉक्टरांच्या आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाला एक मोठी यंत्रणाच उभी करावी लागणार असल्याच्या प्रतिक्रियाही अनेक निवासी डॉक्टरांकडून येत आहेत.

No comments:
Post a Comment