मुंबई : अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी आणखी पारदर्शकरीत्या करावी. लाभार्थींचे निकष, धान्याबरोबर डाळ, तेल आदी वस्तू देण्यात याव्यात. इत्यादी ८ महत्त्वाच्या मागण्यांसाठी अन्न अधिकार अभियान या संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रा. एन.डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ९ जानेवारीला आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी सुरेश सावंत, शोएब लोखंडवाला, अलका श्रीवास्तव आदी पदाधिकारी उपस्थित होते. उल्का महाजन म्हणाल्या की, रेशनकार्डवरील उत्पन्नाचा आकडा खरा कसा मानायचा? ग्रामीण कुटुंबांना वार्षिक ४४ हजार, तर शहरी कुटुंबांना ५९ हजार उत्पन्न र्मयादा शासनाने कशाचा आधारे ठरवली आहे. अशा जाचक अटींचा केशरी रेशनकार्डधारकांना मोठा फटका बसणार आहे. धान्य कोठार ते शिधावाटप या साखळीचे संगणकीकरण करण्याची गेल्या पाच वर्षांपूर्वीची मागणी सरकार कधीही पूर्ण करू शकत नाही. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र फायदा घेत अन्न सुरक्षा कायद्याची महाराष्ट्रात योग्यप्रकारे अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाजन यांनी केली आहे.
Post Top Ad
07 January 2014
Home
Unlabelled
अन्न सुरक्षा कायद्याविरोधात ९ जानेवारीला मोर्चा
अन्न सुरक्षा कायद्याविरोधात ९ जानेवारीला मोर्चा
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment