शनिवारी रिक्षांचे धरणे आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 January 2014

शनिवारी रिक्षांचे धरणे आंदोलन

मुंबई : ऑनलाईनसोबतच लेखी अर्ज सादर करून घ्यावेत, दहावी पासची अट क ाढून त्याजागी ८वी पासचीच अट घालण्यात यावी आणि रिक्षा व्यवसायात येऊ पाहणार्‍या उमेदवारांना डोमिसाईल सर्टिफिकेटची सक्ती करण्यात येऊ नये, अशा अनेक मागण्यांसाठी मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनतर्फे येत्या शनिवारी १ फेब्रुवारी रोजी परिवहन आयुक्तांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील गरीब रिक्षाचालकांच्या भावनांशी खेळत असल्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला राज्यातून हद्दपार करण्यात येणार असल्याचा इशाराही युनियनचे अध्यक्ष शरद राव यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS