3 /1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : 'या खात्याकडून त्या खात्याकडे अशा प्रकारे आम्ही अजून किती फेर्या मारायच्या,' असा सवाल करत 'मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी' संघटनेच्या डॉक्टरांनी गुरुवारीही आझाद मैदानात आंदोलन सुरूच ठेवले.
राज्यातील १२ हजार डॉक्टरांच्या प्रश्नांवर शासन का विचार करत नाही? राज्य सरकार हे न्यायालय व केंद्र सरकार यांचे आदेश का पाळत नाही? असे प्रश्न संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. सतीश जगदाळे यांनी उपस्थित केले. ९ डिसेंबरपासून नागपूर विधान भवनापासून सुरू केलेले हे आंदोलन आजही आझाद मैदानात सुरू आहे. नागपूर येथे शासनाने दिलेले आश्वासन आजही 'जैसे थे' आहे. या डॉक्टरांवर 'बोगस' असा शिक्का मारताना महाराष्ट्र सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आदेश, सर्वोच्च न्यायालयाचे, उच्च न्यायालयाचे आदेश केराच्या टोपलीत का टाकले? असा सवाल संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. यशवंत गावंड यांनी केला. न्याय व विधी खात्याकडे विचारणा केली असता शुक्रवारपर्यंत निर्णय होईल, असे उत्तर दिले आहे, असे डॉ. मनोज देसाई यांनी सांगितले.


No comments:
Post a Comment