2/1/2014 http://jpnnews.webs.com
मुंबई : 'थर्टी फस्र्ट'च्या रात्री मुंबई वाहतूक पोलिसांनी ड्रंक अँण्ड ड्राईव्ह प्रकरणांत ५६८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक पानसलकर यांनी दिली. ड्रंक अँण्ड ड्राईव्ह विरोधात वाहतूक पोलिसांनी बॅनर आणि इतर माध्यमांतून वाहनचालकांमध्ये केलेली जागृती व कठोर कायद्याची अंमलबजावणी यामुळेच या गुन्ह्यांची संख्या गतवर्षापेक्षा कमी झाली आहे.
मावळत्या वर्षाला निरोप आणि नव्या नर्षाच्या स्वागतासाठी 'थर्टी फस्र्ट' डिसेंबरच्या रात्री मोठा जल्लोष साजरा केला जातो. या रात्री अनेकजण मद्यप्राशन करून वाहन चालवतात. त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ होते. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिासांकडून काही वर्षांपासून मद्यप्राशन करून वाहन चालवणार्यांविरोधात प्रचार मोहीम राबवून वाहनचालकांमध्ये जागृती निर्माण केली. या कामासाठी काही सामाजिक संघटनाही पुढाकार घेतात. यंदादेखील ख्रिसमसच्या दिवसापासून वाहतूक पोलिसांनी एनजीओसहित ड्रंक अँण्ड ड्राईव्हच्या विरोधात मोहीम चालवली होती, अशी माहिती सहपोलीस आयुक्त (वाहतूक) विवेक पानसलकर यांनी दिली. मंगळवारच्या 'थर्टी फस्र्ट'च्या रात्री ड्रंक अँण्ड ड्राईव्ह प्रकरणी ५६८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत २७0 गुन्ह्यांनी कमी झाला आहे.
यंदा आपल्या ताब्यातील वाहने बेदरकारपणे चालवल्याप्रकरणी ६२ जणांवर, वेगर्मयादा ओलांडणार्या ४ जणांवर, हेल्मेटचा वापर न करता भरधाव, वाहतूक नियमांचे पालन न करता मोटारसायकल चालवणार्या १५४0 जणांबरोबरच बेल्ट न लावणे, युनिफॉर्म न घालणे, सिग्नल तोडणे आदी प्रकरणांत ५७0 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे पानसलकर यांनी सांगितले. गेल्या वर्षी 'थर्टी फस्र्ट'च्या रात्री ८४0 जणांवर ड्रंक अँण्ड ड्राईव्ह प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. तो आकडा यंदा कमी होऊन ५६८वर आला असून हा फरक कठोर कायदा, लोकांमध्ये जागृती केल्यामुळे, वाहतूक नियमांचे बॅनर बीयर बारच्या आत आणि बाहेर लावून लोकांना मद्यपान केल्यानंतर सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्याचबरोबर टॅक्सी युनियन्सनाही अधिकाधिक टॅक्सी रस्त्यावर उतरवण्याचे आवाहन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यंदा एकही टॅक्सी चालक ड्रंक अँण्ड ड्राईव्ह प्रकरणात अडकला नाही.

No comments:
Post a Comment