आंबेडकर महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला थकबाकी देण्यास टाळाटाळ / आत्मदहनाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 January 2014

आंबेडकर महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला थकबाकी देण्यास टाळाटाळ / आत्मदहनाचा इशारा

बाबासाहेबांच्या अवमानाविरोधात आवाज उठवल्याने 
आंबेडकर महाविद्यालयातील कर्मचाऱ्याला थकबाकी देण्यास टाळाटाळ 
========= पीपल्स कडून न्यायालयाचा अवमान ============
========= लहू सकपाळ यांचा आत्मदहनाचा इशारा ============
मुंबई / अजेयकुमार जाधव       6 / 1 / 2014  http://jpnnews.webs.com
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वडाळा येथील आंबेडकर महाविद्यालय मध्ये लायब्ररी अटेनडट म्हणून नोकरी करणारे लहू सकपाळ यांनी बाबासाहेबांचा आणि त्यांच्या घराण्याचा अवमान करणाऱ्या सिद्धार्थ कांबळे नावाच्या प्राचार्या विरोधात महाविद्यालयातील कर्मचारी युनियनच्या माध्यमाने आवाज उठवल्याने सकपाळ यांना निवृत्ती नंतरची थकबाकी देण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

प्राचार्य सिद्धार्थ कांबळे यांनी बाबासाहेबांची जयंती आंबेडकर महाविद्यालयात साजरी करण्यास नकार दिला होता, परंतु कर्मचाऱ्यांनी सिद्धार्थ कांबळे यांना विरोध करून जयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती, यावेळी कांबळे यांनी बाबसाहेब आणि त्यांच्या घराण्याचा अवमान करणारी विधाने जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केली होती. बाबासाहेबांनीच स्थापन केलेल्या महाविद्यालयामध्ये नोकरी करणाऱ्या प्राचार्याने बाबासाहेबांविरोधात विधाने केल्याने लहू साळवे यांनीकांबळे यांच्यावर कारवाही करावी अशी मागणी केली होती. 

लहू सकपाळ यांनी घडल्या प्रकाराबाबत पिपल्सच्या अध्यक्ष पदाचा दावा करणारे रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्याशी संपर्क साधला होता. याबाबत जोगेंद्र कवडे यांचीही सकपाळ यांनी भेट घेतली होती परंतू कोणाकडूनही सकपाळ यांना न्याय मळलेला नाही. आठवले यांनी तर तिथे आंबेडकरांचे वारस बसले आहेत त्यांना फरक पडत नाही तर तुला काय या भानगडीत पडायची गरज आहे असे सांगून या भानगडीत पडू नये असा सल्ला दिल्याचे सकपाळ यांनी सांगितले. 

पीपल्स कडून मला थकबाकी मिळाली नसल्याने नाईलाजाने मला उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले होते. उच्च न्यायालयाने ३ डिसेंबर २०१२ ला मला दोन महिन्यात थकबाकी देण्याचे आदेश दिले आहेत. परंतू एक वर्ष झाले तरी संस्थेने मला अद्याप थकबाकी दिलेली नाही. असे सकपाळ यांनी सांगितले आहे. मला थकबाकी दिली नसल्याने पीपल्स कडून न्यायालयाचा अवमान केला जात असल्याने येत्या १५ दिवसात थकबाकी मिळाली नाही तर डॉ. आंबेडकर महाविद्यालय, वडाळा येथे आत्मदहन करणार असल्याचा इशारा सकपाळ यांनी दिला आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS