मुंबई : जन कल्याण समितीतर्फे प्रदान केल्या जाणार्या 'परम पूजनीय श्रीगुरुजी' पुरस्कारासाठी यंदा अच्युत गोडबोले आणि सावित्री बाई फुले महिला एकात्म समाज मंडळ यांची निवड करण्यात आली आहे. बोरिवली येथे २३ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. जनकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी सोमवारी या पुरस्काराची घोषणा पत्रकार परिषदेत केली. श्रीगुरुजी पुरस्काराचे यंदा १९ वे वर्ष असून मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ तसेच एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे. यंदा वाड्मय आणि सेवा या दोन गटांत पुरस्कार देण्याचे नियोजन होते. वाड्मय गटातील पुरस्कारासाठी अच्युत गोडबोले यांची, तर सेवा या गटातील पुरस्कारासाठी औरंगाबाद येथील सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाची निवड करण्यात आली आहे.
Post Top Ad
21 January 2014
Home
Unlabelled
सावित्रीबाई फुले मंडळ, अच्युत गोडबोले यांना गुरुजी पुरस्कार
सावित्रीबाई फुले मंडळ, अच्युत गोडबोले यांना गुरुजी पुरस्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment