झोपड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पथकावर दगडफेक - ४ कर्मचारी जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 January 2014

झोपड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पथकावर दगडफेक - ४ कर्मचारी जखमी

मुंबई : विद्याविहार येथील तानसा जलवाहिनीलगतच्या झोपड्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकास तेथील झोपडपट्टीवासीयांनी प्रखर विरोध केला. या वेळी मोठय़ा संख्येने तेथे जमा झालेल्या झोपडपट्टीवासीयांनी या पथकाच्या दिशेने दगडफेक करत पालिकेच्या डंपर तसेच जेसीबीची तोडफोड केली. त्यामुळे तेथे काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेत मनपाचे ४ कर्मचारी जखमी झाले. अखेर या झोपड्यांवर कारवाई न करताच पालिकेच्या पथकास माघारी फिरावे लागले.

मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तानसा जलवाहिनीलगतच्या १0 मीटर क्षेत्रात असलेल्या भांडुप, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर व विद्याविहार येथील १५ हजार झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार पालिकेने या झोपड्या हटवण्याची कारवाई सुरू केली. या झोपडीधारकांना नाहूर येथे पर्यायी जागा देण्यात येणार आहे. मात्र तेथे सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने आहे त्याच परिसरात पुनर्वसन करावे, अशी तेथील रहिवाशांची मागणी होती

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS