मुंबई : बेस्टची भाडेवाढ टाळण्यासाठी बेस्टला १00 कोटी रुपये देण्याचे पालिका प्रशासनाने मान्य केले असले तरी बेस्टपुढे आर्थिक संकट कायम आहे. स्थायी समितीकडून बेस्टला उपक्रमाला १५0 कोटींचा निधी अर्थसंकल्पात फेरपार करून उपलब्ध न झाल्यास बस भाडेवाढ अटळ असल्याचे संकेत बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी दिले आहेत.
महागाई, इंधन दरवाढ तसेच अन्य काही कारणांमुळे बेस्ट उपक्रमाने १ एप्रिल २0१४ पासून बस भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला, मात्र आगामी निवडणुका लक्षात घेऊन तसेच विरोधी पक्षांचा विरोध लक्षात घेऊन बस भाडेवाढ टाळण्यासाठी स्थायी समितीने बेस्ट उपक्रमाला प्रथम १६00 कोटींचे कर्ज दिले. तसेच क्रूड ऑईलवरील २ टक्के जकात करात 0.२४ टक्के दरवाढ करून त्यापोटी मिळणारे २२५ कोटी रुपये, उत्पन्न परिवहन निधी म्हणून १00 कोटी रुपये व आणखीन ५0 कोटी रुपये अशी ३७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला. मात्र पालिका आयुक्तांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात बस भाडेवाढ करण्यासाठी १५0 कोटी रुपये निधी देण्याऐवजी अवघी १00 कोटींची तरतूद केली.
या संदर्भात बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांच्याकडे विचारणा केली असता पालिकेच्या अर्थसंकल्पात फेरफार करण्याचे अधिकार स्थायी समितीला आहेत. अर्थसंकल्पाला सभागृहाची मंजुरी मिळणे बाकी आहे. मनपाने जे १00 कोटी रुपये देऊ केले, ते वापरता येतील तोपर्यंत वापरा मग पुढे काय तो निर्णय घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.

No comments:
Post a Comment