मध्य रेल्वेवर वर्षभरात 72 नवीन लोकल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मध्य रेल्वेवर वर्षभरात 72 नवीन लोकल

Share This
मुंबई - मध्य रेल्वेवरील जुनाट लोकल भंगारात काढून नवीन 72 लोकल पुढील वर्षीपर्यंत धावू लागतील. महिलांच्या सुरक्षेसाठी मेट्रोप्रमाणे डब्यांत फिरते सीसी टीव्ही कॅमेरे लावण्यात येतील. प्रायोगिक तत्त्वावर 165 कॅमेरे लावले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनचे प्रभात सहाय उपस्थित होते. 

एमयूटीपी-2 मधील प्रकल्पांसाठी रेल्वे अर्थसंकल्पात एक हजार 22 कोटींची तरतूद आहे. ए वन, ए व बी दर्जाच्या स्थानकांत वायफाय सुविधा पुरवण्यात येणार आहेत. या सुविधा सुरुवातीच्या 15 मिनिटांसाठी विनामूल्य असतील. त्यानंतर त्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी माहिती या वेळी देण्यात आली. मुंबईतील मध्य व पश्‍चिम रेल्वेच्या मार्गावरील छत्रपती शिवाजी टर्मिनस, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुंबई सेंट्रल, चर्चगेट, बोरिवली, ठाणे, कल्याण, वांद्रे या स्थानकांचा यात समावेश आहे. पनवेल व ठाकुर्ली स्थानकांवर टर्मिनस बनवण्यात येतील, असे सूद यांनी सांगितले. 

मध्य रेल्वेवरील डीसी ते एसी रूपांतर 31 मार्चपर्यंत पूर्ण होईल. वातानुकूलित गाडीची चाचणी ऑक्‍टोबरपर्यंत पश्‍चिम रेल्वेवर घेण्यात येईल. बंबार्डियर लोकल मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

कोकण रेल्वे - टुरिस्ट गाईडकोकण रेल्वे प्रशासनाने स्थानिक रिक्षा व टॅक्‍सीचालकांना पर्यटनाचे गाईड म्हणून प्रशिक्षण दिले आहे. त्यांना टुरिस्ट गाईड म्हणून कोकण रेल्वेतर्फे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. ही योजना मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येईल आणि त्यातून किमान 50 हजार नागरिकांना स्वयंरोजगार मिळेल, असा विश्‍वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages