मेट्रो १ : तिकीट दर निश्‍चिती समिती कागदावरच - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मेट्रो १ : तिकीट दर निश्‍चिती समिती कागदावरच

Share This
मुंबई : मेट्रोचे तिकीट दर ठरवण्यासाठी आवश्यक असलेल्या दर निश्‍चिती समितीची स्थापना अजूनही करण्यात आली नसूनही मुख्यमंत्र्यांनी खोटी माहिती दिल्याचे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी स्पष्ट केले आहे. केंद्र शासनाने अजूनही फेअर फिक्सेशन कमिटी गठीत झाल्याचे कोणतेही आदेश जारी न केल्याचे स्पष्ट केले असून वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो वन मार्गिकेच्या प्रवाशांसाठी आवश्यक असणार्‍या फेअर फिक्सेशन कमिटी केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.


केंद्रीय शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासोबत १२ जानेवारी रोजी पार पडलेल्या बैठकीत जस्टिस ई पद्मनाभन यांच्या नेतृत्वाखाली समिती गठीत झाल्याचे सांगत मेट्रोचे भाडे कमी करण्याची विनंती न्यायालयात करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. मात्र मास रॅपिड ट्रान्सपोर्टेशन सिस्टिम १ अर्थात एमआरटीएसचे संचालक आणि केंद्रीय जन माहिती अधिकारी प्रकाश सिंह यांनी फेअर फिक्सेशन कमिटी गठीत करण्याचे आदेश अजूनही जारी न झाल्याचे स्पष्ट केले आहे. मेट्रो अँक्ट ऐवजी ट्रामवेज अँक्ट कार्यान्वित करण्याचे पत्र पंतप्रधानांना पाठविल्याचे सांगितले आहे. वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या पहिल्या मेट्रो मार्गिकेचे तिकीट दर वाढल्यापासून सर्वसामान्यांनी पुन्हा एकदा या मार्गिकेदरम्यान बेस्टला बसला पसंती दिली आहे. सुरुवातीचे प्रमोशनल तिकिटाचे दर सर्वसामान्यांसाठी परवडणारे होते. मात्र आता ४0 रुपयांचे तिकीट परवडेनासे असल्याचे मत सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात आले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages