भाजपाची स्वबळाची तयारी - 227 जागांसाठी 512 नावांची यादी तयार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 January 2017

भाजपाची स्वबळाची तयारी - 227 जागांसाठी 512 नावांची यादी तयार

मुंबई - महापालिका निवडणूकींसाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत अद्याप निर्णय न झाल्याने भाजपाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. निवडणूक समितीची तीन दिवस 20 तास बैठक घेऊन भाजपाने 227 जागांसाठी 512  नावांची वॉर्ड निहाय चर्चा करुन यादी तयार केली आहे. मात्र अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांना देण्यात आले आहेत.

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणूक समितीत 29 सदस्यांचा समावेश होता. या समितीने सलग तीन दिवस 20 तास चर्चा केली. काल रात्री 3 वाजता समितीची बैठक संपली. महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे 2500 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्याममधून 1769 नावांची यादी तयार करण्यात आली. मात्र त्यानंतरही ब-याच नावांचा विचार करून समितीने अखेर 512 नावांची यादी तयार केली. प्रत्येक वॉर्डासाठी 2 ते 3 नावे या प्रमाणे ही यादी तयार असून, युतीचा निर्णय झाल्यानंतर अंतिम यादी तयार करुन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे पाठवण्यात येणार आहे. 

Post Bottom Ad