ठाणे - आगामी महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी आयकर अधिकार्यांची नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी दिली. यामुळे निवडणुकीत आवाढव्य खर्च करून मतदारांना भूल पाडणार्या उमेदवारांना लगाम लागणार आहे. निवडणूक यंत्रणोत पारदर्शकता यावी, याकरिता हे पाऊल उचलले गेल्याचे बोलले जात आहे.
शुक्रवारी, सहारिया हे ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. येत्या निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला आपले नामनिर्देशन पत्र संगणकावरील निवडणूक विभागाच्या वेबसाईटवर जाऊन भरावा लागणार आहे. त्यासाठी त्याला वेळेचे कोणतेही बंधन असणार नाही. काही बाबी भरायच्या शिल्लक असतील, अर्जात काही त्रुटी असतील तरी देखील त्या भरण्याची मुभा त्याला असणार आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षाच्या लोकांना देखील या संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने उमेदवाराला संगणकाचे ज्ञान नाही, असे म्हणताच येणार नसल्याचेही ते म्हणाले. हे नामनिर्देशन पत्र भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून ती निवडणूक अधिकार्याकडे द्यावी, जेणेकरून त्याची उमेदवारी पक्की मानली जाणार आहे. निवडणुकीच्या कामाच्या ठिकाणी काही वेळेस कर्मचार्यांवर अतिरिक्त कामासाठी दबाव आणला जातो. त्यामुळे कर्मचार्यावर या कामाचा ताण येऊन चक्कर येणे किंवा इतर काही प्रकार घडू शकतात. त्यामुळेच आता निवडणुकीतील कर्मचार्यांवर अतिरिक्त ताण देण्याचा प्रय▪झाल्यास संबंधित अधिकार्यांवर नियमानुसार कडक कारवाई केली जाणार
असल्याचेही सहारिया यांनी सांगितले.ठाणो आणि उल्हासनगर महापालिकेत चार जणांचे पॅनल असल्याने प्रत्येक मतदाराला चार मते द्यावीच लागणार आहेत. इलेक्ट्रिक व्होटिंग मशीनवर चार मते दिल्याशिवाय बिप वाजणार नसल्याने प्रत्येकाने याची काळजी घ्यावी. तसेच त्याची माहिती घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच मतदान केंद्रावरील कर्मचारी देखील याविषयी मतदात्याला कल्पना देणार आहे. एखाद्याला दोनच उमेदवार पसंत असतील अन्य त्यांना मते द्यायची नसतील तर प्रत्येक अ, ब, क आणि ड अशा चारही व्होटिंग मशीनचे शेवटचे बटण हे नोटा असणार आहे. त्यामुळे अशा वेळी मतदार या बटणाचा वापर करू शकणार आहे. ठाणेमहापालिका हद्दीत ६ आणि उल्हासनगर महापालिका हद्दीत ५ आयकर अधिकार्यांची नेमणूक करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.