
हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि प्रतीकात्मक स्वरूपात पार पडले. आंदोलनादरम्यान रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होऊ दिला गेला नाही. बाह्यरुग्ण विभाग, आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया कक्ष तसेच इतर सर्व अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आल्या.
BMC MARD ने निवेदनात म्हटले आहे की, आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नाही. डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयीन कर्मचाऱ्यांची सुरक्षितता ही तडजोड न करता येणारी बाब असून रुग्णालयांमध्ये हिंसाचाराविरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरणाची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे.
सायन MARD नेही या हल्ल्याचा तीव्र निषेध करत सांगितले की, अशा घटना केवळ डॉक्टरांवरील हल्ले नसून संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील आघात आहेत. प्रत्येक आरोग्यसेवा कर्मचाऱ्याला सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरणात काम करण्याचा मूलभूत अधिकार आहे.
दोन्ही संघटनांनी दोषींवर तातडीने आणि कठोर कायदेशीर कारवाई, निश्चित कालमर्यादेत न्याय, तसेच सर्व शासकीय आणि महापालिका रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी केली आहे. आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांवरील हिंसाचार रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवून रुग्णालयांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.


No comments:
Post a Comment