
मुंबई | JPN NEWS : सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील ‘संनिरीक्षण अन्वेषक’ संवर्गातील १३३ कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांना पूर्वीप्रमाणे २४०० ग्रेड पे कायम ठेवण्याची मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने केली आहे.
यासंदर्भात संघटनेचे अध्यक्ष बाबा कदम आणि उपाध्यक्ष डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशींमध्ये ‘संनिरीक्षण अन्वेषक’ या संवर्गाला यापूर्वी देण्यात आलेला २४०० ग्रेड पे रद्द करून तो २००० करण्याची शिफारस करण्यात आली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांकडे नियुक्तीच्या वेळी आवश्यक असलेली ‘स्वच्छता निरीक्षक पदविका’ (Sanitary Inspector Diploma) नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे.
मात्र, म्युनिसिपल कर्मचारी सेनेच्या म्हणण्यानुसार, २००९ मध्ये या पदासाठी १३३ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. त्यावेळी या पदाची शैक्षणिक पात्रता दहावी उत्तीर्णवरून बदलून ‘स्वच्छता निरीक्षक पदविका’ अनिवार्य करण्यात आली होती. प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या भरतीच्या जाहिरातीतही ही शैक्षणिक पात्रता स्पष्टपणे नमूद करण्यात आली होती.
त्यामुळे २००९ च्या जाहिरातीनुसार निवड झालेल्या सर्व १३३ कर्मचाऱ्यांकडे संबंधित पदविका असल्याचा दावा संघटनेने केला आहे. असे असताना त्यांचा ग्रेड पे कमी करणे आणि यापूर्वी देण्यात आलेल्या वाढीव ग्रेड पेची वसुली करणे अन्यायकारक असल्याचे डॉ. संजय कांबळे-बापेरकर यांनी म्हटले आहे.
या निर्णयाचा फेरविचार करून १३३ कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणे २४०० ग्रेड पे कायम ठेवावा, तसेच या प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यासाठी संघटनेला तातडीने वेळ द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच, २००९ मध्ये १३३ ‘संनिरीक्षण अन्वेषक’ पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने प्रसिद्ध केलेली जाहिरातही निवेदनासोबत सादर करण्यात आली असून, तिची नोंद घेऊन संबंधित प्रकरणाचा फेरविचार करण्याची मागणी संघटनेने केली आहे.


Andaba buscando algo que me ayudara a entender por qué el promedio que aparecía en el sistema de postulación a becas del Estado era ligeramente diferente al que me había certificado la secretaría académica de mi facultad en un documento oficial firmado y timbrado esa misma semana reciente. Este sitio explica perfectamente las razones técnicas y metodológicas por las que esas discrepancias tan pequeñas pero potencialmente significativas pueden existir entre distintos sistemas institucionales que calculan el mismo indicador con criterios levemente diferentes entre sí. Me ayudó a entender cuál de los dos valores era el correcto para usar en esa postulación a beca tan importante para mi continuidad de estudios universitarios ese año. Un contenido muy clarificador que resolvió una confusión burocrática potencialmente muy costosa que podría haberme hecho perder una beca importante por usar el dato incorrecto sin saberlo. http://www.calculadoradenotas.cl
ReplyDelete