
मुंबई | JPN NEWS : रक्षाबंधनाचा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून प्रेम, विश्वास, काळजी आणि संरक्षणाचा अतूट धागा आहे. दिवस-रात्र सेवा बजावणारे महापौर बंगल्यातील कर्मचारी हे आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग आहेत, अशा भावना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी व्यक्त केल्या.
भायखळा येथील महापौर निवासस्थानी शुक्रवारी (२८ ऑगस्ट) महापौर बंगल्यातील कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधनाचा सण कौटुंबिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
महापौर रितू तावडे आणि आमदार चित्रा वाघ यांनी कर्मचाऱ्यांना स्वतः राखी बांधून त्यांचे औक्षण केले. तसेच कर्मचाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सण-उत्सवाच्या काळातही आपले कर्तव्य बजावत नागरिकांची आणि महापौर निवासाची सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.


No comments:
Post a Comment