फॉर्च्युनरच्या नंबरप्लेटवर ‘फ्लिपिंग’ यंत्रणा!, वाकडमध्ये वाहनमालकाविरोधात गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2026

फॉर्च्युनरच्या नंबरप्लेटवर ‘फ्लिपिंग’ यंत्रणा!, वाकडमध्ये वाहनमालकाविरोधात गुन्हा दाखल


पुणे JPN NEWS - वाहनाची नंबरप्लेट लपवून वाहतूक पोलिसांचे चलन, स्पीड कॅमेरे तसेच पोलिसांची नाकाबंदी आणि दंडात्मक कारवाई टाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी फॉर्च्युनर वाहनाच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाहनाच्या मागील नंबरप्लेटवर आरटीओच्या परवानगीशिवाय उघडझाप करणारी म्हणजेच फ्लिपिंग यंत्रणा बसवण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

या प्रकरणी वाकड वाहतूक विभागातील पोलीस हवालदार रोहीदास धोंडू बोऱ्हाडे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय भगवान दगडे (रा. ताथवडे, पुणे) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३३६(३), ३१८(४), ३१९(२) तसेच मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १९८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

नंबरप्लेट लपविण्यासाठी यंत्रणा बसवल्याचा आरोप - 
पोलिसांच्या माहितीनुसार, दगडे यांच्या ताब्यातील टोयोटा फॉर्च्युनर (एमएच १४ एलएन ४८८८) या वाहनाच्या मागील नंबरप्लेटवर नंबर स्पष्टपणे दिसू नये, यासाठी बनावटीकरण करून यांत्रिक फ्लिपिंग यंत्रणा बसवण्यात आली होती.

ही यंत्रणा वापरून नंबरप्लेट झाकणे किंवा लपवणे शक्य होत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे वाहतूक शाखेचे ई-चलन, आरटीओची कारवाई, स्पीड कॅमेऱ्यातील नोंद, पोलिसांची नाकाबंदी तसेच इतर दंडात्मक कारवाईपासून बचाव करण्याचा उद्देश असल्याचा आरोप FIRमध्ये करण्यात आला आहे.

गुन्हा केल्यास वाहनापर्यंत पोहोचणे कठीण करण्याचा संशय - 
नंबरप्लेट लपविण्याची यंत्रणा केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी नव्हे, तर वाहनाचा वापर करून अपघात किंवा अन्य गुन्हा घडल्यास तपास यंत्रणांना वाहन आणि चालकापर्यंत पोहोचता येऊ नये, या उद्देशाने बसवण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी FIRमध्ये व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारे नंबरप्लेटमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.

९ सप्टेंबरला गुन्हा दाखल - 
ही घटना ८ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४.४२ वाजण्यापूर्वी घडल्याचे FIRमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ९ सप्टेंबर २०२६ रोजी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची नोंद FIRमध्ये आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS