गणेशोत्सवासाठी Konkan Railway प्रवाशांना दिलासा; मुंबई-सावंतवाडी मार्गावर अतिरिक्त विशेष गाड्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2026

गणेशोत्सवासाठी Konkan Railway प्रवाशांना दिलासा; मुंबई-सावंतवाडी मार्गावर अतिरिक्त विशेष गाड्या


मुंबई JPN NEWS - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्यांची संख्या वाढवली आहे. मध्य रेल्वेने मुंबई ते सावंतवाडी रोड दरम्यान चार अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, पश्चिम रेल्वेकडूनही मुंबई सेंट्रल–सावंतवाडी मार्गावर दोन विशेष फेऱ्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सव १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत साजरा होत असून, या काळात रेल्वेने एकूण ३८६ गणपती विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेच्या २५८, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ५८ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे.

CSMT–सावंतवाडी चार अनारक्षित विशेष गाड्या - 
मध्य रेल्वेच्या चार अतिरिक्त अनारक्षित विशेष गाड्यांपैकी गाडी क्रमांक ०१००९ CSMT येथून १२ आणि १३ सप्टेंबर रोजी दुपारी १.४५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

परतीच्या दिशेने गाडी क्रमांक ०१०१० सावंतवाडी रोड येथून १३ आणि १४ सप्टेंबर रोजी पहाटे ४.०५ वाजता सुटून त्याच दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता CSMT येथे पोहोचेल.

या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

गाडीत १२ शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन असतील. अनारक्षित डब्यांसाठी UTS प्रणालीद्वारे तिकीट घेता येणार आहे.

मुंबई सेंट्रल–सावंतवाडी दोन अतिरिक्त फेऱ्या - 
पश्चिम रेल्वेने गाडी क्रमांक ०९०१९ मुंबई सेंट्रल–सावंतवाडी रोड विशेषच्या दोन अतिरिक्त फेऱ्या जाहीर केल्या आहेत. ही गाडी २५ आणि २६ सप्टेंबर २०२६ रोजी धावणार असून, या दोन्ही फेऱ्यांसाठी तिकीट आरक्षण १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून PRS काउंटर आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होणार आहे.

कोकण मार्गावर गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी RPF, GRP आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून विशेष व्यवस्था केली आहे. प्रवाशांनी अनोळखी वस्तूंना हात न लावणे, सामान विना-देखरेख न ठेवणे, फूटबोर्डवरून प्रवास न करणे तसेच रेल्वेच्या घोषणांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संशयास्पद वस्तू किंवा हालचाल आढळल्यास तातडीने RPF, GRP किंवा स्टेशन मास्टरला माहिती द्यावी अथवा १३९ या सुरक्षा हेल्पलाइनवर संपर्क साधावा, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS