
मुंबई JPN NEWS - अनंत चतुर्दशी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो वनने आपल्या सेवांच्या वेळेत वाढ केली आहे. १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मेट्रो सेवा रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे.
वाढीव वेळेनुसार वर्सोवा ते घाटकोपर मार्गावरील शेवटची मेट्रो रात्री १२.१५ वाजता, तर घाटकोपर ते वर्सोवा मार्गावरील शेवटची मेट्रो रात्री १२.४० वाजता सुटेल. घाटकोपरहून सुटलेली शेवटची मेट्रो वर्सोवा येथे रात्री १.०३ वाजता पोहोचणार आहे.
गणेशोत्सव आणि अनंत चतुर्दशीच्या काळात मोठ्या संख्येने प्रवासी मेट्रोचा वापर करण्याची शक्यता असल्याने सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोयीस्कर वाहतूक सेवा देण्यासाठी वेळ वाढविण्यात आल्याचे मुंबई मेट्रो वन प्रशासनाने सांगितले.


No comments:
Post a Comment