घाटकोपरमध्ये घाईघाईने पूल बंद; रेल्वे प्रवाशांची गैरसोय, नव्या पुलाचे काम अपूर्णच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2026

घाटकोपरमध्ये घाईघाईने पूल बंद; रेल्वे प्रवाशांची गैरसोय, नव्या पुलाचे काम अपूर्णच


मुंबई JPN NEWS - मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घाटकोपर रेल्वे स्थानकात अंधेरी-घाटकोपर मेट्रोमुळे प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी सीएसएमटी बाजूस मेट्रो स्थानकाला जोडणारा पूल तसेच त्याच्या बाजूला आणखी एका पुलाची उभारणी करण्यात आली आहे. मात्र, ठाणे बाजूस झुनझुनवाला कॉलेज ते पंतनगरला जोडणारा रेल्वे प्रवाशांसाठीचा पूल बुधवारी (१६ सप्टेंबर) बंद करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय सुरू झाली आहे.

या पुलाच्या बाजूलाच नव्या पुलाचे बांधकाम सुरू आहे. मात्र, नव्या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. पायऱ्यांचे बांधकाम, छप्पर बसविणे आणि इतर आवश्यक कामे बाकी असतानाच प्रवाशांसाठीचा विद्यमान पूल बंद करण्यात आला आहे.

घाटकोपर स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. त्यात मेट्रोमुळे स्थानक परिसरातील गर्दीत आणखी भर पडली आहे. अशा परिस्थितीत नियमित वापरातील पूल बंद केल्याने प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत असून, त्यातून अतिरिक्त अंतर आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

नवा पूल पूर्णपणे प्रवाशांच्या वापरासाठी सज्ज होण्यापूर्वीच विद्यमान पूल बंद करण्याची घाई का करण्यात आली, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. नव्या पुलाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून तो प्रवाशांसाठी खुला करावा, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS