
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (९ सप्टेंबर) सायंकाळी सुमारे ५ वाजता जोगेश्वरी स्थानकाच्या दक्षिणेकडील पादचारी पुलावर टीसी आणि एका प्रवाशामध्ये वाद झाला. तिकीटाबाबत विचारणा केल्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
या घटनेची माहिती मिळताच स्थानकावरील ड्युटीवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच GRPला माहिती देण्यात आली. GRPच्या प्राथमिक चौकशीत ड्युटीवरील टीसी आशीष रंजन गुप्ता यांनी प्रवाशाने चेहऱ्यावर प्रहार केल्याचा आरोप केला. या घटनेत टीसीच्या चेहऱ्याला दुखापत होऊन रक्तस्राव झाल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, संबंधित प्रवाशाची ओळख अजय (वय ३१) अशी पटली असून तो जोगेश्वरी परिसरात राहत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
घटनेनंतर टीसी आणि संबंधित प्रवाशाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी GRPच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा तपास सुरू असून, हाणामारीचे नेमके कारण आणि पुढील कारवाईबाबत GRPकडून माहिती घेतली जात आहे.


No comments:
Post a Comment