
ब्लॉकच्या पहिल्या टप्प्यात ७ ते ९ ऑक्टोबरदरम्यान लोकल आणि मेल-एक्स्प्रेस सेवांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ७ आणि ८ ऑक्टोबर रोजी सीएसएमटी-कसारा मार्गावरील काही लोकल आसनगावपर्यंतच धावणार आहेत. त्याचप्रमाणे कसारा-सीएसएमटी मार्गावरील काही फेऱ्या आसनगावहून सुरू करण्यात येणार आहेत.
७ आणि ८ ऑक्टोबर रोजी ब्लॉकपूर्वी सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी शेवटची लोकल दुपारी १२.३० वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीसाठी शेवटची लोकल दुपारी २.४२ वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर सीएसएमटीहून कसाऱ्यासाठी पहिली लोकल सायंकाळी ६.२८ वाजता, तर कसाऱ्याहून सीएसएमटीसाठी पहिली लोकल रात्री ८.३५ वाजता सुटेल.
याशिवाय ८ आणि ९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. यामध्ये सीएसएमटी-कसारा, टिटवाळा-ठाणे आणि कसारा-सीएसएमटी मार्गावरील काही सेवांचा समावेश आहे.
या कामामुळे कसारा-असनगाव विभागातील उपनगरीय वाहतुकीवर परिणाम होणार असून, मेल-एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही आवश्यकतेनुसार बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या कालावधीत कसारा, आसनगाव, खर्डी आणि पुढील मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी रेल्वेचे अद्ययावत वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.


No comments:
Post a Comment