राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर; २ ते १५ नोव्हेंबरदरम्यान सुट्ट्यांचे नियोजन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 October 2026

राज्यातील शाळांना दिवाळीची सुट्टी जाहीर; २ ते १५ नोव्हेंबरदरम्यान सुट्ट्यांचे नियोजन


मुंबई JPN NEWS - राज्यातील मान्यताप्राप्त प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील दिवाळीच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, विद्यार्थ्यांना २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार असून, १४ नोव्हेंबरपर्यंत सुट्टीचा कालावधी राहणार आहे. त्यानंतर रविवारची सुट्टी वगळता शाळा १६ नोव्हेंबर २०२६ पासून पुन्हा सुरू होतील.

३१ ऑक्टोबरला पहिले सत्र संपणार - 
माध्यमिक शाळा संहितेनुसार, चालू शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र १५ जून २०२६ रोजी सुरू झाले असून, ते ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी संपणार आहे. दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या सणांचा समावेश आहे.

१६ नोव्हेंबरपासून दुसरे सत्र -
दिवाळीच्या सुट्टीनंतर १६ नोव्हेंबर २०२६ पासून दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होणार आहे. हे सत्र १ मे २०२७ पर्यंत चालणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना ३ मे ते १४ जून २०२७ या कालावधीत उन्हाळी सुट्टी मिळणार आहे.

एकूण सुट्ट्यांवर मर्यादा - 
माध्यमिक शाळा संहितेनुसार, संपूर्ण शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या सुट्ट्यांची एकूण संख्या ७६ दिवसांपेक्षा अधिक होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या नियोजनामुळे विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक आधीच ठरवता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS