कामाच्या गुणवत्तेवर आधारित निकषांचा विचार -
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रोत्साहन भत्त्याचे सुधारित निकष ठरवताना पोषण, आरोग्य, पूर्वशालेय शिक्षण, उपस्थिती आणि गृहभेटी या बाबींचा विचार करण्याच्या सूचना मंत्री तटकरे यांनी दिल्या. या निकषांच्या आधारे भत्ता निश्चित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

दोन लाखांहून अधिक कर्मचारी कार्यरत -
राज्यात शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे तसेच गर्भवती मातांचे पोषण आणि आरोग्य यांची काळजी घेण्यासाठी मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. राज्यात सध्या १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० अंगणवाडी मदतनीस, असे एकूण २ लाख १४ हजार ९७ कर्मचारी कार्यरत आहेत.
कामाच्या गुणवत्तेनुसार अंगणवाडी सेविकांना दरमहा १,५०० ते २,००० रुपये, तर मदतनीसांना ५०० ते १,००० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याची तरतूद १ ऑक्टोबर २०२४ पासून लागू करण्यात आली आहे. आता या भत्त्याच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याच्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही होणार आहे.

इतर योजनांचाही आढावा -
बैठकीत एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या अतिरिक्त आहार योजना, आदर्श अंगणवाडी योजना आणि बेबी केअर किट योजना यांचाही आढावा घेण्यात आला. सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने मंत्री तटकरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या बैठकीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त माधवी सरदेशमुख, सहसचिव वी. रा. ठाकूर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment