माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावणार; नेरळ-माथेरान रेल्वे सेवा सुरू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 October 2026

माथेरानची मिनी ट्रेन आजपासून पुन्हा धावणार; नेरळ-माथेरान रेल्वे सेवा सुरू


मुंबई JPN NEWS - पर्यटकांचे आकर्षण असलेली नेरळ-माथेरान मिनी ट्रेन पुन्हा एकदा रुळांवर धावणार आहे. मध्य रेल्वेने ३० ऑक्टोबर २०२६ पासून नेरळ आणि माथेरानदरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव जून ते ऑक्टोबर या कालावधीत ही सेवा बंद ठेवण्यात येते. आता पावसाळा संपल्यानंतर पर्यटक आणि प्रवाशांसाठी ही सेवा पुन्हा उपलब्ध होणार आहे.

नेरळ-माथेरान दरम्यान दररोज दोन फेऱ्या - 
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेरळहून माथेरानकडे दररोज दोन गाड्या धावतील.

- गाडी क्रमांक ५२१०३: नेरळहून सकाळी ८.५० वाजता सुटून माथेरानला ११.३० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ५२१०५: नेरळहून सकाळी १०.२५ वाजता सुटून माथेरानला दुपारी १.०५ वाजता पोहोचेल.

माथेरानहून नेरळकडे परतीच्या गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.

- गाडी क्रमांक ५२१०४: माथेरानहून दुपारी २.४५ वाजता सुटून नेरळला सायंकाळी ५.३० वाजता पोहोचेल.
- गाडी क्रमांक ५२१०६: माथेरानहून दुपारी ४ वाजता सुटून नेरळला सायंकाळी ६.४० वाजता पोहोचेल.

पहिल्या जोडीच्या गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणीचे तीन डबे, एक व्हिस्टाडोम डबा आणि द्वितीय श्रेणीसह दोन लगेज व्हॅन असतील. दुसऱ्या जोडीच्या गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणीचे तीन डबे, एक प्रथम श्रेणीचा डबा आणि द्वितीय श्रेणीसह दोन लगेज व्हॅन असतील.

अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरूच - 
अमन लॉज आणि माथेरानदरम्यानची शटल सेवा दररोज सुरू राहणार आहे. या मार्गावर दोन्ही दिशांनी दररोज सहा फेऱ्या चालवण्यात येतील.

अमन लॉज ते माथेरान : सकाळी ८.४५, ९.३५, दुपारी १२, २.२५, ३.४० आणि सायंकाळी ५.४५ वाजता गाड्या सुटतील. प्रवासाचा कालावधी १८ मिनिटांचा असेल.

माथेरान ते अमन लॉज : सकाळी ८.२०, ९.१०, ११.३५, दुपारी २, ३.१५ आणि सायंकाळी ५.२० वाजता गाड्या सुटतील. या गाड्याही १८ मिनिटांत अमन लॉज येथे पोहोचतील.

शनिवार-रविवारी अतिरिक्त विशेष फेऱ्या - 
प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन शनिवार आणि रविवारी अमन लॉज-माथेरान मार्गावर अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.

अमन लॉजवरून सकाळी १०.३० आणि दुपारी १.३५ वाजता विशेष गाड्या सुटतील. तर माथेरानवरून सकाळी १०.०५ आणि दुपारी १.१० वाजता अतिरिक्त गाड्या अमन लॉजसाठी रवाना होतील.

मध्य रेल्वेने प्रवाशांना या वेळापत्रकाची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. मिनी ट्रेन पुन्हा सुरू झाल्यामुळे माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांना रेल्वे प्रवासाचा आनंद घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS