मंडळाचे आधारस्तंभ संजय परब आणि किशोर वार्डे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अध्यक्ष शारदाप्रसाद यादव आणि उपाध्यक्ष संतोष पांडे यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. घटस्थापनेने उत्सवाची सुरुवात होणार असून, सुस्वर भजन, देवीची आरती आणि गरबा यांसारख्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नवरात्रोत्सवात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात भाविकांना देवीच्या दर्शनासोबतच विविध कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.
सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम -
नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर मंडळाचा विशेष भर असतो. रहिवासी आणि देणगीदारांसाठी मोफत नेत्रतपासणी व वैद्यकीय शिबिर आयोजित केले जाते. तसेच महिलांना साडीवाटप करण्यात येते. महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हळदी-कुंकू समारंभ आणि विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. लहान मुलांसाठीही विविध स्पर्धा आणि कला-कौशल्यविषयक उपक्रम राबवून त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन दिले जाते.

अष्टमीला सत्यनारायण महापूजा आणि होमहवन -
नवरात्रोत्सवातील अष्टमीच्या दिवशी सत्यनारायण महापूजा आणि होमहवनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या धार्मिक विधींमध्ये परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. दसऱ्याच्या दिवशी साईबाबांचा पालखी सोहळा आणि देवीमातेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीत परिसरातील नागरिक आणि भाविक सहभागी होऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.
१९८१ पासून सुरू असलेली परंपरा जपत नवतरुण मित्र मंडळाने धार्मिक उत्सवाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही महत्त्व दिले आहे. त्यामुळे ‘विक्रोळीची अंबाई’ नवरात्रोत्सव हा परिसरातील भाविकांसाठी श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव ठरत आहे.

No comments:
Post a Comment