Mumbai पालिकेच्या स्थायी समितीत उबाठाचा आवाज दाबला? यशोधर फणसे यांचा माईक बंद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 November 2026

Mumbai पालिकेच्या स्थायी समितीत उबाठाचा आवाज दाबला? यशोधर फणसे यांचा माईक बंद


मुंबई JPN NEWS - मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष यांच्यातील राजकीय संघर्षाचे पडसाद आता स्थायी समितीच्या बैठकीतही उमटू लागले आहेत का, असा प्रश्न बुधवारी घडलेल्या एका प्रसंगामुळे उपस्थित झाला आहे. नियोजन विभागाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सदस्य यशोधर फणसे यांचा माईक बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे विरोधकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.

या प्रकारावर बैठकीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी सदस्यांना उद्देशून, “सर्वांनी गप्प बसा, मग आवाज ऐकू येईल,” असे वक्तव्य केले. त्यानंतर बैठकीची व्यवस्था पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी फणसे यांचा माईक सुरू केला आणि त्यांचे म्हणणे ऐकू येऊ लागले.

मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता असताना विरोधी पक्ष म्हणून शिवसेना (उबाठा) सदस्यांना सभागृहात आपले म्हणणे मांडताना माईकसारख्या मूलभूत व्यवस्थेचा अडथळा येणे, हा चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांचा आवाज सभागृहात ऐकला जाणार की तो तांत्रिक अडथळ्यांमध्येच अडकणार, असा सवाल या घटनेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे.

माईक बंद पडण्यामागे तांत्रिक कारण होते की अन्य काही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अध्यक्षांच्या वक्तव्यामुळे आणि त्यानंतर माईक सुरू झाल्यामुळे स्थायी समितीतील या प्रसंगाला राजकीय संदर्भ प्राप्त झाला आहे.

No comments:

Post a Comment

Ad Space

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS